समर्पण

समर्पण एका स्त्री चे...

          स्त्री अशी व्यक्ती आहे जी फक्त दुसऱ्यांच्या सुखासाठी जगत असते.. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणारी, स्वतःला नाही भेटलं तरी चालेल पण कुटुंब, व मुलांना भेटाव अशी नेहमीच इच्छा बाळगणारी.. घरचे सर्व आनंदी तर आपण आनंदि ही संकल्पना मनात घेऊन चालणारी स्त्री..!

खरचं हे सर्व फक्त स्त्रीनेच करावं का...?



        आधी स्त्री फक्त चूल आणि मूल ह्यात गुतलेली असायची.. असायची म्हण्यापेक्षा तीला फक्त तेच काम करायला दिलं जायचे. बाहेर पडणे म्हणजे पुरुषाचा अपमान.. पण आता जग बदलत आहे, सर्व बंधनं तोडून स्त्री पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे. ती सर्व काही करत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचे अस्तित्व आहे.. कुटुंब, ऑफिस हे सर्व एकटीने अगदी आनंदाने आणि व्यवस्थित manage करत आहे.. एवढ असूनही स्त्री ही खरंच स्वतंत्र आहे का....?

      खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे... प्रत्येक क्षणी नवीन वादळ तिच्या आयुष्यात येतच असते, कधी तिच्यावर होणार अन्याय तर कधी बलात्कार, तिच्याकडे वाईट नजरेनं पाहणे हे सतत तीला भोगावं लागतं...

      जी स्त्री शिखरांच्या उचं टोकावर पोहचते तिच्या घरी विचारांना स्वतंत्र असते आणि त्यातूनच ती बहरते आपल्या स्वप्नाला अस्तित्वात आणते.. घरच्यांचा मिळणारा support आणि नवऱ्याची साथ हे एका स्त्री साठी खरी ताकद असते आणि ह्यामुळे स्त्री कोणतेही ध्येय पूर्ण करू शकते..

       ज्या स्त्रिया हे करू शकत नाही त्यांना मागे खेचण्यासाठी कोण जबाबदार असेल, हा समाज, घर की स्त्री स्वत: ..??
कदाचित तिनिही...!!

       काहीवेळा एका स्त्री च्या कर्तुत्वाने, मार्गदर्शनाने, दुसऱ्या स्त्रियांना पाठिंबा मिळतो.. पण त्याच स्त्री ने समाजासारखी वागणूक आणि मानसिकता ठेवली तर...!!

       खरचं आहे ना खूप विचार करण्यासारखी बाब... पण ह्या सर्वाची सुरुवात स्वतःपासून करा.. तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष हे इंपॉर्टन्ट नाहीये तर आपण एक समाज आहोत हे लक्षात ठेवा.. आणि आपल्या सर्वांना समान अधिकार आहेत.. त्यामुळे आपण कोणतेही मतभेद न करता समान जगलं पाहिजे.. स्त्रियांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे, त्याच्या इच्छा प्रमाणे वागायला मदत केली पाहिजे...

        एका स्त्री ने ठरवलं तर हे जग बदलू शकते.. पण आपल्याला ह्या समाजाची मानसिकता बदलायची आहे..
ह्या साठी तुम्ही आहात ना तयार..मग आज पासूनच सुरुवात करू...

धन्यवाद!

- स्नेहा जोगले





Comments