"मी माणुसकी बोलतेय"

नमस्कार...
       ओळखलत का मला..?? कसं ओळखणार हल्ली विसरला आहात तुम्ही सगळे मला..! आधी मी सगळीकडे सर्वांमध्ये राहायचे सर्वांना आनंद द्यायचे. मी होते म्हणूनच तर नाती घट्ट होती, सर्व एकत्र होते आणि कोणी आपलं न्हवतं की कोणी परकं, होते तर फक्त मी.... अजुन नाही ओळखलत ना..?? हाहा थांबा मी तुम्हाला माझी ओळख एका कोड्यातून करून देते...ऐका हा नीट, जर कोणी अनोळखी व्यक्ती पडली तर आधी आपण त्यांना उचलायचो त्यांना मदत करायचो पण आता लोक आधी व्हिडिओ काढतात आणि मग हसतात पण त्या व्यक्तीला उचलत नाहीत आता सांगा बरं तुम्ही माणसं काय विसरला आहात ते...?? बरोबर ओळखलंत तुम्ही.. होय मी "माणुसकी" बोलतेय...!! मला माहित होतंच की माणूस आहेच हुशार पण राग मानू नका बरं खर सांगू का या हुशार पणा मुळेच माणसाची आज ही अवस्था झाली आहे आणि मी तुमच्या मधून हरवली आहे म्हणतात ना ''अति तिथे माती''.


           माणसाने आपल्या हुशारीचा वापर करून लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि काम लवकरात लवकर व्हावी म्हणुन "Technology" चा शोध लावून वेगवेगळी माध्यमे माणसाला जोडण्यासाठी आणली पण तो यामध्ये इतका गुंतला की तो मलाच विसरला....आज आपलीच माणसे सकाळी उठल्यावर Good Morning चा मेसेज सगळ्यांना पाठवतात पण घरात मात्र...?? फेसबुक वर खूप मित्र, खूप पोस्ट आणि खूप लाईक्स असतात पण आपण जिथे राहतो तिथे आपल्या बाजूला कोण राहत ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं... व्हॉट्स ऍप चे स्टेटस पाहून आपण पटापट रिप्लाय देतो पण घरी आईने आवाज दिल्यावर साधा हो आई पण तोंडातून निघत नाही...माणसाची नेहमी तक्रार होती की त्याला वेळच मिळत नाही कसा मिळणार ना कारण तो निसर्गाच्या जगातून कधीच हरवला होता तो तर स्वतः च्या जगातच दडून गेला होता... म्हणूनच मला प्रश्न पडतो की माणसाने नक्की मला वाढवण्यासाठी त्याचा हूषारीचा वापर केला की मला गमवण्यासाठी...?? आणि म्हणूनच आज कोरोणा सारखा आजार देशभरात पसरला आहे कशासाठी...??नीट विचार करा... अगदी बरोबर... मी बोलले होते ना तुम्ही आहातच खूप हुशार....
          बघा ना कशी निसर्गाची जादू कोणी थोर व्यक्तीने म्हटले आहे ना की लांबी उडी घेण्यासाठी चार पावलं मागे यावी लागतात आज निसर्गाने तोच धडा परत आपल्याला शिकवला आहे ते ही शंभर पावलं मागे घेऊन. आज आपण विसरलो आहोत स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या लोकांना, मुक्या प्राण्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे त्या निसर्गाला... आणि म्हणून पुन्हा निसर्गाने आपल्याला अश्या संकटात टाकलं आहे कारण निसर्गाला ही माहित आहेत माणूस हुशार आहे स्वार्थी नाही, तो या संकटातून नक्कीच खूप मोठी सकारात्मक शिकवण घेईल परत मला स्वतःत पाहिलं, स्वतःला नवीन जन्म देवून स्वतःला ओळखेल, आपला वेळ आपल्या कुटुंबाला देईल म्हणूनच त्याने सर्वांना कुटुंबासोबत घरी सुरक्षित ठेवलं आहे शेवटी निसर्गाला ही माणसाला शिकवण द्यायची होती...
आता विसरणार नाहीत ना मला आणि हो आता निघते मी बर का फक्त जाता जाता एक सांगेन खचून जावू नका लक्षात ठेवा "आपत्ती से ही आविष्कार होता है".. घरीच रहा,सुरक्षित रहा आणि काळजी घ्या..!

धन्यवाद..!

- जया सकपाळ.





Comments

Post a Comment