हर पल यहा जी भर जियो....



"हर घडी बदल रही हैं रूप जिंदगी,
छाव हैं कही, कही हैं धूप जिंदगी,
हर पल यहा जी भर जियो....!
जो हैं समा.... कल हो ना हो...."




ह्या गाण्याचा कडव्यातील एक अन् एक शब्द खरा आहे ना...!
बघा म्हणजे प्रत्येक घडी(क्षण) बदलत आहे.
आता सुरू असलेला सगळ्यांचा लाडका विषय;

गावी कोकणात छान गार वारा, पावसाच्या धारा सुरू आहेत, निसर्ग मनमोकळा वागत आहे. आणि आपला मुंबईकर म्हणतोय, गरमीणे उकडून गेलोय रे देवा...! गावची लोक नशीबवान रे आणि चाकरमनी फुटक्या नशिबाचे. हो.. पण
हे ठरवत कोण आहे आपण स्वतः ... ??
माझ्या Rebirth या लेखात मी शेवटी लिहलं होतं, निसर्गाने माणसाला बनवले आहे माणसाने निसर्गाला नाही.
मग "मित्रांनो हर पल यह जी भर जियो..!" का स्वतःला, नशिबाला आणि निसर्गाला दोष देताय ?
निसर्गाने जन्म दिलाय मानवाचा मस्त enjoy करा, नवनवीन गोष्टी शिका.
आयुष्यभर यश मिळो ना मिळो प्रयत्न कधीच सोडू नका.
"कर्म करो फल की आशा ना करो."
आपले प्लॅन ठरवा आणि कामाला लागा, उद्या जे करणार आहात ते आजच सुरू करा.
आयुष्य हे एक उनाड, मोकळ्या पक्ष्यासारखे आहे.
आपले स्वतंत्र तत्व, आयुष्य जपा, स्वतःवर विश्वास ठेवा...!

करा ना ती फोटोग्राफी जी तुम्हाला खुणावतेय किंवा उघडा स्वतःचे छोटेसे हॉटेल...!

पैसा सुरुवातीला कमी मिळेल, मात्र मानसिक आनंदाला मोजमाप नसेल.
आयुष्यात तेच करा ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

तिकडे वेळेचे टिक टिक पुढे पळत आहे.
स्वप्न बघा, त्या साठी मेहनत घ्या, त्यांना खरे करा, आनंद घ्या, आनंद लुटा.

हे खरे आहे की काही गोष्टी योग्य विचारांती कराव्यात, घाई करू नये, अती संथ पणाही ही तेवढाच वाईट, म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडा वेग घ्या.

त्यामुळे ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे, त्यासाठी भरपूर जगा, चुका होतील, मात्र चुकांच सांत्वन करत बसू नका.
स्वतःला माफ करा, चुका मधून शिका आणि पुढे चला.

कदाचित आयुष्य एक नवी दिशा तुम्हाला दाखवेल.
प्रवाहाच्या उलट्या दिशेने चाला मात्र तक्रार करत बसू नका. असामान्य कामगिरी करा.

Take advantage of every moment.
(प्रत्येक क्षणाचा फायदा करून घ्या).


धन्यवाद. 


- कु. अंकिता विजय पेंडुरकर

Comments

Post a Comment