पुनर्जन्म (Rebirth)

नमस्कार,
गेला एक महिना माझ्या डोक्यात हेच सगळे विचार सुरू आहेत. कदाचित म्हणूनच आजूबाजूला ही तसच ऐकायला वा पाहायला मिळत आहे.
    आज पुस्तकं वाचताना एक सुंदर विषय सुरू झाला,"इच्छा आणि आवश्यकता (Need)" माणसाला ह्या मधील काय निवडायचं हे कळलं तर किती बरं होईल....!!
       आता पाहा ना संपूर्ण एक महिना कदाचित त्याही पेक्षा अधिक दिवस उलटून गेलेत; पण आपण वडापाव, भजी पाव इत्यादी(Fastfood) न खाता राहतोय, घरातील पौष्टिक अन्न खावूनच जगतोय. कसे काय बरे ! ही तर जादूच झाली म्हणावी लागेल.
     दुसरी गोष्ट सगळ्यांची तक्रार आहे सध्या झोप लागत नाही वगैरे, मात्र अस का होतंय कळतंय का ?
         दिवस भर त्याच बातम्या पाहून, शेजारी चर्चा करून आज नेता वाईट तर उद्या पोलीस वाईट म्हणजे रोजच्या दिवसात कोणी ना कोणी वाईटच आणि रात्री ह्याच विचारांसोबत झोपायचे म्हणजे मनात रागाची भावना ठेवून कशी येईल निवांत झोप...!!
हे सगळं घडण्या मागे निसर्गाचा फार मोठा डावपेच आहे. जो आपल्याला कळत नाहीये.
        निसर्ग आपलं काम सुरळीत पार पाडतोय, प्रदूषण कमी झालंय, सगळ्यांना साफ स्वच्छ हवा मिळतेय, माणसासारखा नाही वागत निसर्ग. द्वेष मनात ठेवून वागला असता तर आज कोणीच सांगू शकत नाही नेमके काय झाले असते.
माणूस असणं वाईट नाहीये मात्र वाईट विचार करणं, आपल्याला आनंद मिळावा म्हणून कोणाला तरी (निसर्ग, मुके जीव) त्रास देणं हे फार वाईट.
आज ह्या वाईट परिस्थिती मध्ये कोण बाहेर फिरत आहे आणि कोण चार भिंतीं मध्ये हे तुम्ही जाणता.. मी काय बोलावं ह्या वर ?
   हो मान्य आहे, आपण २०/३० वर्षांमागे गेलो आहोत पण कोणामुळे निसर्गामुळे ? मुळीच नाही. का २०/३० वर्षांपूर्वी माणसं राहत नव्हती का....?? आणि जर राहत होती तर कशी, नो सोशल मीडिया ! म्हणजेच कुटुंबाला वेळ देणं, स्वतःचा विकास करायला वेळ देणं म्हणजे रोज व्यायाम, पुस्तकं वाचणं, योग्य तो आहार.
नो फोन कॉल्स त्यामुळे प्रत्यक्षात भेटणं असायचं. मात्र आता कोणाला काय झालंय हे सोशल मीडिया वर कळतं.
म्हणूनच हा निसर्गाचा मोठा डाव पेच आहे. 
      आणि थोर विचारवंत बोलून गेलेत, जे होतं ते चांगल्यासाठीच. हो चांगल्यासाठीच झालंय सगळं कारण पृथ्वीचा नवाजन्म (Rebirth)होतोय.
चला तर मग ह्या मोठ्या शिकवणीतून एक धडा घेवूयात...
"निसर्गाने माणसाला बनवलंय माणसाने निसर्गाला नाही."
कारण आज आपण तयार केलेली अवजारे आपल्याच कामी येत नाहीत...!!


धन्यवाद...
अंकिता पेंडूरकर.

Comments

Post a Comment