टॉलस्टॉयची शाळा एक - मुक्तद्वार

टॉलस्टॉयची शाळा एक - मुक्तद्वार

             नमस्कार मित्रांनो शिक्षण क्षेत्रात काम करत असताना. सहज वाचनात आलेले टॉलस्टॉय एक माणूस हे पुस्तक. टॉलस्टॉय हे सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्त्व. लिओ टॉलस्टॉय हे त्यांचे पूर्ण नाव. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे टॉलस्टॉयला गुरु मानत असत. टॉलस्टॉयने साहित्य व शिक्षण क्षेत्रात खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
         टॉलस्टॉयने कोणते काम अंगावर घेतले की तो त्यात आत्मीयतेने व्यग्र होई. शाळेचे काम अत्यंत हौशीचे असल्याने त्यांनी तन-मन-धन वाहून घेऊन त्याने शाळा उभारली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम खूप अभुतपूर्वक होते. शिक्षणाचा हेतू, पद्धती, मुलांच्या प्रतिक्रिया, आकलनाची प्रक्रिया व्यक्ती या दृष्टीने मुलांचा विचार शिक्षक - विद्यार्थी यांचे संबंध या प्रत्येक गोष्टीवर त्याने मूलगामी विचार केला.
        टॉलस्टॉय ची शाळा ही खेड्यातल्या मुलांसाठी होती. व्यक्ती सुसंस्कृत, ज्ञानसंपन्न व कार्यप्रवण झाली तर मानवतेचे वाटेल तितके हीत करू शकेल. म्हणून व्यक्तिनिष्ठ शिक्षणपद्धतीवरच भर होता. शाळा म्हणजे एका लहान मुलावर हितकारक प्रयोग करून पाहण्याची प्रयोगशाळा अशी त्याची धारणा होती. तो लहान मुलांवरील निस्सीम प्रेमामुळे तहान भूक विसरून मुलांच्या निरागस विश्वात रमून गेला. त्याच्या दृष्टीने शाळा म्हणजे मंदिर होते. त्यावर त्यांनी प्रत्यक्षात पत्रात दिलेले शब्द असे - "सध्या मी एका सुंदर विश्वात असं काही रमून गेलो आहे की त्यापासून स्वतःला ओढून काढणे जवळ-जवळ अशक्य आहे. हे सुंदर विश्व म्हणजे माझी शाळा".
          टॉलस्टॉयची शाळा ही तीन मोठ्या खोल्यांची एक गुलाबी व दोन निळ्या या खोल्यांचा वर्गासाठी उपयोग करायचा. त्यापैकी एका खोलीत वस्तुसंग्रहालय होतं. वेगवेगळ्या प्रकारचे दगड, फुलपाखरे, सांगाडे, गवतांचे अनेक प्रकार, फुलांचे प्रकार इत्यादी वस्तू या संग्रहालयात असत. हे संग्रहालय रविवारी सर्वांसाठी खुले राही. आठवड्यातून चार वेळा गायन व सहा वेळा चित्रकला शिकवायचा. मुलांना कसे शिकवायचे हे आधी तो शिक्षकांना शिकवत असे. शाळेचे वर्ग हे सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत असायचे. पण दुपारचे सत्र दुपारी दोन लाच भरायचे व बराच वेळ चालायचे मुलांना घरी जायला सांगणे फार अवघड जाई.
          टॉलस्टाय व त्याचे शिक्षक मित्र रोज दैनंदिनी लिहीत असत. त्या दैनंदिनीत रोज विद्यार्थ्यांच्या अर्थपूर्ण घटना टिपून काढाव्यात मुलांची उल्लेखनीय वैशिष्ट्ये लिहावीत असा त्याचा सर्व शिक्षकांना आग्रह असायचा. हे सर्व शिक्षकांना मान्य होते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानसाधनेची आवड उत्पन्न करणे हे शिक्षकाचे काम.,ध्येय, जिज्ञासाचा दिवा पेटवला की तेथे शिक्षकाचे काम जवळ जवळ काम संपले. मग प्रत्येकाने आपापल्या गतीने, मगदुराप्रमाणे प्रगती करावी. शिक्षक फक्त साह्य करणार. विद्यार्थ्याला शाळेविषयी अजिबात नावड उत्पन्न होणार नाही यासाठी तो खूप दक्ष असायचा. शिक्षण ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे विद्यार्थ्यांना पटले पाहिजे. यासाठी टॉलस्टॉयने शाळेच्या दरवाज्यावर मुक्तद्वार अशी पाटी लावली होती.
          कोणीही कधीही यावे - जावे, आधी आल्यास मुले बाहेर खेळत असत. कंटाळा आला की उठून जायची परवानगी. मुलांचा शिक्षणात रस उत्पन्न करून अधिक वेळ शाळेत ठेवण्याची जबाबदारी ही शिक्षकांचे असे. शाळेचे रेखीव असे वेळापत्रक नव्हते. शिक्षकाकडे मुलांनी लक्ष दिलेच पाहिजे अशी सक्ती नव्हती. शिक्षक जर उत्तम रीतीने शिकवत असतील तर मुले आपोआपच गप्प बसतात यावर त्याचा विश्वास होता. शिक्षक एखाद्या विषय शिकवत असताना मुलांना चित्र काढण्याची लहर आली तर तसे करण्याची पूर्ण मुभा होती. टॉलस्टॉयची शाळा शिक्षा आणि बक्षिसे या दोन्हींपासून अलिप्त होती. उशीरा आल्याबद्दल मुलांना शिक्षण असे पण मुलांच्या मनात शिक्षकांनी शिकण्याची एवढी गोडी निर्माण केली होती की विद्यार्थी उशिरा येतच नसत.
        टॉलस्टॉय मुलांना लांब- लांब फिरायला घेऊन जात असे. निरनिराळ्या गोष्टींची माहिती सांगे. मुलांना खूप शिकायला मिळेल तोही अभिरभावाने मुलांचा अभ्यास करी. मुले त्याचा हात धरून चालायची वाटेल असे प्रश्न विचारले तेव्हा मात्र टॉलस्टॉय च्या हजरजबाबदार पणाची परीक्षा असे. मुले त्याला चमत्कारिक प्रश्न विचारीत की गायन व चित्रकलेचा उपयोग काय. त्यावेळेस टॉलस्टॉय सांगे "अरे, सर्वच वस्तूंचे महत्त्व केवळ उपयोग वरून ठरवायचे नसते. लगेच मुलांचा दुसरा प्रश्न तयार असायचा.
         पाश्चिमात्यांचा कोणत्याही शिक्षण पद्धतीचे अनुकरण त्याने केले नाही. मुलांच्या विकासाची प्रक्रिया म्हणजे एक अलौकिक कला आहे. अशी त्याची भावना होती.
        बाकी, तो मुलांना शिकवायचा, असे सर्वजण म्हणत असत इतकेच. त्याच्या दृष्टीने पाहता मुले त्याला पुष्कळदा गोष्टी शिकवत होती; आणि तो 'मुलांचा विद्यार्थी ' होता.

- भरत जाधव - नॅशनल अबॅकस प्रशिक्षक 

Comments

  1. मुलांचा विद्यार्थी बनणारे मार्गदर्शक ही गरज झाली आहे.
    खूप छान लेख.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर हृदयस्पर्शी लेख लहानपणी स्वप्नात शाळा अशीच असावी असे नेहमी वाटायचे श्री भरत सरांचे आभार व अभिनंदन.💐

    ReplyDelete

Post a Comment