विषामृत

 विषामृत - लहानपणी आम्ही हा खेळ खेळायचो ! ज्याच्या वर राज्य आहे तो इतरांना हात लावून 'विष' म्हणायचा आणि मग विष बाधा झालेला एका जागी बसून राहायचा, इतर मग राज्य असलेल्या मुलाला चुकवून त्या विष बाधा झालेल्या मुलाला हात लावून ' अमृत ' म्हणायचे आणि तो परत खेळात पुनर्जन्म झाल्यामुळे पळायला लागायचा. पण आता ह्या वेळेस असाच खेळ पालक आणि त्यांचा मुलांमध्ये सुरु आहे आणि राज्य पालकांवर आहे.

आपल्या मुलांना ते विष देतात की अमृत (दचकलात ना. विचारात पडलात की आम्ही आमच्या मुलांना स्वप्नात देखील विष देण्याचा विचार करू शकत नाहीच मुळी आणि तुम्ही हे काय विचित्र सांगताय आम्हाला)
नक्कीच! राग आला असेल तुम्हाला कि नकळत आपण आपल्या गोंडस बाळांना कसे विष देत आहोत. 
काळजी करु नका या विषाच्या ऐवजी स्मार्ट पालक बनून अमृत कसे द्यायचे हे आपण पाहुयात आता

 पाल्य - " आई... मी जाणार नाही आज शाळेत!"
 पालक -  " सोनू ,आपण येतांना मोठ्ठी कॅडबरी खाऊ! आता तरी जा!"

..........विष!!!..........

 पाल्य - " मला तो व्हिडिओ गेम घेऊन द्या ना बाबा !"
 पालक - " देईन ना बेटा ,पण आधी प्रॉमिस कर तू रोज सायकल चालवणार ग्राउंड वर !"

..........अमृत!!!..........

 पाल्य - "आई... आज आपण पिझ्झा ऑर्डर करुयात का?"
 पालक - हो, चालेल ना! त्या बरोबर कोल्ड ड्रिंक पण ऑर्डर करू, जरा पचन होईल मग!"

..........विष!!!..........

  पाल्य - " बाबा ,रिमोट द्या ना मला कार्टून पहायचे आहे !"
  पालक - " अरे आयडिया आली मला ,चल तुझ्या मित्रांना घेऊन मी पण क्रिकेट खेळतो ! " 

..........अमृत!!!..........

 पाल्य - " आई ,मला खूप भूक लागलीय ,पैसे दे ना ,मी चिप्स किंवा दुकानातून काही खाऊ आणतो!"
 पालक - "हे घे! एक कशाला २ पॅकेट आण! माझा राजा बेटा ग!"

..........विष!!!..........

 ही काही उदाहरणे आहेत ,तुम्ही सखोल विचार करुन पहा!

 मी विष म्हणतो कारण त्यामुळे मुलाच्या वाढी वर अतिशय वाईट आणि दूरगामी परिणाम होतो. ढोबळ मानाने लक्ष्यात घ्या .....
१ चॉकलेट - १ का चपाती ची भूक कमी करते , एक मोठी कॅडबरी पूर्ण दिवसाची भूक कमी करते. ह्या empty calories असतात. तात्पुरते एनर्जी दिल्याचा भास भ्रम निर्माण करतात. पण सर्वांगीण वाढीच्या दृष्टीने शून्य उपयोग !
गोड खावे वाटले तर मनुके, गूळ, खोबरे, शेंगदाणे, चणे, खजूर, ड्राय फ्रुट्स द्या खारीक द्या. तिखट वाटले खावेसे तर घरी भरपूर शेंगदाणे व खोबरे टाकलेला मस्त चिवडा द्या. अजून खूप रेसिपीज आहेत त्या YouTube वर पहा आणि बनवून ठेवा ,पण शक्यतो बिस्किट्स,चॉकलेट्स, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि तत्सम इतर फास्ट फूड (Junk Food) देऊ नका.
  घरचे ताजे शिजवलेले अन्न...
..........अमृत!!!..........

  बाहेरचे फास्ट फूड
..........विष!!!..........

राज्य तुमच्यावर आहे पालकांनो , तुम्ही ठरवा काय द्यायचे ते (लेकरांना कळत नसते ,आणि पालकांना वळत नसते )
थोडा विचार करा................
तुमच्या मुलांना विषमय का अमृतमय जीवन द्यायचे हे फक्त तुमच्याच हातात आहे


श्री. अजिंक्य मांढरे
(ज्योतिष आणि वास्तू तज्ञ)

Comments