मनाशी हितगुज!

मनाशी हितगुज!

आजच्या धावपळीच्या (आपण करून घेतलेल्या) युगात नाती दूर जाताना दिसतायत. आपण खरच विचार करून काही करू शकतो का? कुणाच काय चाललय, कुणाला काय आवडतंय, कोणाला कधी राग येतो, कोणी कधी प्रेमाने वागतात. थोडस जोखामिचच झालाय सगळ. 
काही वर्षांपूर्वी आजी आजोबा यांच्या वागण्याचा, जुन्या गोष्टी सांगण्याचा आपल्याला त्रास होत होता. पण आता तर कामावर जाणाऱ्या, आपल्या साठी जीवाच रान करणाऱ्या (अस त्यांना वाटत) आई वडील, ममी पापा, Mom & Dad ह्यांचाही त्रास होऊ लागलाय.
काय कारण असेल?
संवाद थांबलाय आपल्यातला! समजून घेतच नाही आहे कोणी कोणाला. 
आपले विचार व्यक्त कोणाकडे करावेत खरच कळत नाही आहे काय आपल्याला?
कारण काय असेल? काय चुकतंय?
कॉलेज आणि वय वाढण्याची एकाच वेळ त्याच बरोबर शाररिक आणि मानसिक नैसर्गिक बदल.
मित्रांमध्ये, नात्यांमध्ये काहीवेळा तर व्यवहारामध्ये आपण गोंधळून जातो. आपला आपल्या वरचा विश्वास डगमगू लागतो. हे सगळं का होत असेल? कसे होत असेल?
जीवनातील समस्या (Problems) आणि आव्हाने (Challenges) काय आहेत? आणि का आहेत
फक्त एकाच गोष्टी मुळे आहेत आणि ती म्हणजे मी (स्वत:). माझ्या मुळे आहे हे सगळ. 
मला स्वताला ओळखायला हवं. मला स्वताला समजून घ्यायला हवं.
आपण स्वताला सोडून जगाला ज्ञान वाटत बसतो ते जरा स्वतः साठी वापरायला हवं.
स्वतःबद्दल विचार करायला हवा नाहीतर स्वतःला उंच उचलण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवं.

मार्गदर्शक : श्री. शशिकांत शिंदे - 09029545455.




Comments