शर्यत


नमस्कार,

आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वांचीच धावपळ होताना आपण पाहतोय आणि या धावपळीमध्ये सगळ्यांची नकळत शर्यत लागलेली आपल्याला दिसत आहे. या धावपळीमध्ये सर्वात मोठी शर्यत चालू आहे ती म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांची, बरोबर ना? तुम्हा सर्वाना ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट माहित असेलच हो ना! त्यांची शर्यत होती ती सर्वात वेगवान कोण हे ठरवण्यासाठी, तर पालक आणि विद्यार्थ्यांची शर्यत चालू आहे ती म्हणजे जास्त मार्क्स मिळवण्यासाठी! जर आपल्या मुलाने पैकीच्या पैकी मार्क्स मिळविले तर तो हुशार आणि जर कमी मार्क्स मिळविले तर मात्र....? तुम्हाला माहित असेलच गोष्टीतला ससा अत्यंत वेगवान असूनही शर्यत मात्र जिंकतो तो कासवचं. कारण शर्यतीसाठी फक्त वेग महत्वाचा नाही तर त्याच बरोबर महत्वाची आहे सलग्नता. थोडासा विचार करा कि जी आपल्या मुलांची मार्क्ससाठी शर्यत चालू आहे ती कासवाप्रमाणे आहे कि सश्याप्रमाणे....?
पालकांनो तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी खूप जागृत आहेत हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याने खूप अभ्यास करावा चांगले मार्क्स मिळवावे असे तुम्हाला वाटते आणि ते बरोबर हि आहे. पण पालक म्हणून एक लक्षात असुद्या त्यांच्यात एक कलाकार आहे ज्याला गणित कळत नाही. त्यांच्यात एक व्यावसायिक आहे ज्याला इतिहास आवडत नाही. त्यांच्यात एक शास्त्रज्ञ आहे ज्याला मराठी समजत नाही. त्यांच्यात एक खेळाडू आहे ज्याला अभ्यासाच्या कसरतीपेक्षा शारीरिक कसरत ज्यास्त महत्वाची वाटते. आपल्या मुलाने चांगले मार्क्स मिळविले तर उत्तम पण नाही मिळवता आले तर रागावू नका. त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान घालवू नका. त्याला सांगा परीक्षेच्या मार्क्सपेक्षाही महत्त्वाचा गोष्टी आहेत. आयुष्यात त्याने मिळवलेल्या मार्क्सवरून त्याची बुद्धिमत्ता तुम्ही ठरवणार नाही हे त्यांना सांगा. इतरांच्या मार्क्स सोबत त्याच्या मार्क्सची तुलना तुम्ही करणार नाही हे त्याला समजवा कारण लक्षात ठेवा त्याची शर्यत इतर कोणाबरोबर नसून त्याची शर्यत स्वतःशीच आहे. एक परीक्षा किंवा त्यात मिळालेले कमी मार्क्स मुलांचा भविष्य ठरवू शकत नाही. शेवटी परीक्षा महत्त्वाची नाहीत कि मार्क्स, महत्त्वाचे आहे तर ते शिकणं..!
प्रत्येक मूल हे वेगळ असत आणि प्रत्येक मुलात पुष्कळशी विशिष्ट कौशल्ये असतात गरज आहे तर त्या कौशल्यांना योग्य वळण व मार्ग दाखवण्याची. आपल मूल एक माणूस म्हणून समाजापुढे कसं येतं हे त्यांना शिकवण्याचे कारण अनुभवातून जे शिकतो तेच खरं शिक्षण!!!

- जया सकपाळ - VERSATILE EDUCARE SYSTEM

Comments