आजचा युवा


नमस्कार,

मित्रांनो आज सर्वत्र क्रिकेटमय वातावरण झालेला आपल्याला दिसत आहे. त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर २०-२० हा प्रकार खूपच डोक्यात घेतला आहे. मित्रांनो २०-२० हे ऐकल्यावर फक्त क्रिकेटच कसे काय आठवू शकते आपल्याला? भारतीयांना २०-२० चा अर्थ फक्त क्रिकेट पुरताच कळलेला किंवा मर्यादित ठेवलेला आहे.
मित्रांनो २०-२० या अंकाचा अर्थ वर्ष २०२० म्हणजेच आपल्या भारत देशाचे थोर वैज्ञानीक माजी राष्ट्रपती - डॉपीजेअब्दुल कलाम सर यांनी म्हटल्या प्रमाणे २०२० चा अर्थ आसा होतो कि भारत २०२० साली विकसित देश होणार, महासत्ता होणार आणि ते असे म्हणतात कि या सर्व घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका हि तरुण पिढी ची असणार आहे.
डॉ. कलाम सर यांनी म्हटल्या प्रमाणे भारताचे भविष्य हे तरुणांचा हातात आहे. पण खरंच भारतीय तरुण हे आव्हान पेलवू शकतील का? "आजचा तरुण उद्याची दशा दिशा ठरवणार आहे. पण याच तरुणांना फितवणारे खूप आहेत, त्यांचा दुरुपयोग करून घेणारे खूप आहेत. आजच्या तरुणांना त्यांची ध्येय काई आहेत ते माहित नाही. अपयश आले की लगेच आत्महत्या करतात किंवा ती गोष्ट पुन्हा करत नाहीत. आजचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होते चालला आहे. सिनेमामुळे तर तो वेगळ्या जगात गुंतत चालला आहे. हे जर असेच चालू राहीले तर भारताची सर्वात मोठी ताकद असलेला भारतीय तरुण प्रभावहीन, नेतृत्वहीन व दिशाहीन होईल असे वाटत आहे.
महासत्ता बनून विकसित देशांच्या पंगतीत बसायचे असेल तर आपल्या भारतीय तरुणांनी स्वतःला बदलणे / विकसित करणे खूप महत्वाचे आहे.
असे म्हणतात की 'तरुण' या तीन अक्षरी शब्दांत संपूर्ण जग सामावलेले आहे. एक तरुण म्हणजे नव्या विचारांची, आचारांची  नंदी आहे.

डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम सर यांच्या स्वप्नातील भारतीय तरुण कसा असावा त्याबद्दल त्यांनी सांगीतले होते की -

"ज्याच्या चेहेऱ्यावर तेज आहे,
ज्याची ईच्छाशक्ती प्रबळ आहे,
ज्याचे ध्येय उच्च आहेत,
तो सिंहासारखा निर्भय आहे,
आणि सरतेशेवटी त्याचे चरित्र शुद्ध आहे,
तोच आणि तोच आदर्श युवक आहे"

या जगात वावरत आसलेल्या तमाम तरुण - तरुणींनो, तुमच्यावर आणि तुमच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थान असणारे आय. पी. एस. ऑफिसर - विश्वास नांगरे पाटील सर यांच्या "मन में है विश्वास" पुस्तकात लिहितात की - ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्याच्या स्वप्नांमध्ये उमेद आहे. फक्त पंख असून उपयोग नाही. खरी भरारी त्या पंखांमध्ये असणाऱ्या ताकदीवरच्या विश्वासामुळे येते
हा विश्वास आजून घट्ट करणारा एकच व्यक्ती म्हणजे आजचा तरुण...

धन्यवाद!


भरत जाधव - VERSATILE EDUCARE SYSTEM

Comments

Post a Comment