युवासाधना

युवासाधना

आज मी असच आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे भाषण यु - टयूब वर ऐकत होते. त्यांची खूप भाषणे ऐकल्यावर जर तो उत्तम श्रोता असेल तर त्याला हे नक्की जाणवेल की मोदीजी जास्तीत जास्त प्राधान्य हे युवा वर्गाला देतात. असाच विचार माझ्या पण मनात आला. भारताची लोकसंख्या १२५ कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. ह्या लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग युवा वर्गाने व्यापला आहे. ह्याच युवा वर्गाला पुढे घेऊन प्रगती करण्याचा विचार माननीय पंतप्रधान करत आहेत. पण ही प्रगती तेव्हाच होणार जेव्हा आपला युवा प्रगत असेल. जर का देशातील तरुण वर्ग वैचारिक  मानसिक पातळीवर प्रगत असेल तरच ह्या देशाची परागती शक्य आहे असे माझे मत आहे. तेव्हाच आपला भारत देश हा प्रगतीपथावर जाऊन पोहोचेल. त्यासाठी आपल्या युवा वर्गाने स्वतःची प्रगती करणे अधिक गरजेचे आहे. ह्या 'YOUTH DEVELOPMENT' ची सुरुवात लहानपणापासूनच होते किंवा व्हायला हवी. कारण एक लहान मुलाचं पुढे जाऊन तरुण युवक किंवा युवती होते.
मुलांच्या प्रगतीत सर्वात मोठा वाट हा त्यांच्या पालकांचा असतो. पालकांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीपेक्षा त्यांच्या बौद्धिक विकासावर भर द्यायला हवा. कारण जेव्हा व्यक्तिमत्त्वात प्रगती होते त्याच वेळी आभ्यासातदेखील प्रगती होते. पालकांनी आपल्या मुलांच्या कौशल्यांचा विचारांचा अभ्यास करून त्यांच्या अंगी असलेल्या शक्ती - गुणांचा विचार करून त्यांना योग्य ती दिशा देणे गरजेचे आहे. मुल जेव्हा स्वावलंबी होते त्याच वेळेस त्या मुलातिल आत्मविश्वास वाढतो. जेवढा जास्त आत्मविश्वास तेवढी जास्त प्रगती होत असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवणे जास्त गरजेचे आहे. ह्याचे उत्तम उदाहरण आपल्याला इतर देशातील पालकांमध्ये दिसून येते. त्यामुळे तेथील मुले ही वयोमानापेक्षा जास्त हुशार स्मार्ट दिसून येतात. जसे पालकांचे स्थान महत्त्वाचे असते तसेच मुलं शाळेत गेल्यावर तेथील शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे असते. शाळा हा मुलांच्या आयुष्यातील मोठा भाग व प्रगतीचा टप्पा असतो. शालेय वयात मुलांच्या बौद्धिक विचारांच्या प्रगल्भतेवर शिक्षकांनी भर देणे गरजेचे असते. हे विचार सकारात्मक दृष्टीकोनातून असणे हे जास्त महत्त्वाचे आहे. ह्यासाठी मुलांना सततचे देण्यात आलेले ज्ञान, संवाद त्याचबरोबर आयुष्यातील अनेक गोष्टींचे पैलू कसे उघडावे ह्याबाबतची माहिती इ. गोष्टी त्यांच्या कानावर पडणे महत्त्वाचे आहे. शालेय वयानंतर मुलांची महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात होते. बाल्यावस्थेतून प्रौढअवस्थेतून मुले पदार्पण करतात. ह्या वेळेपासूनच मुलांच्या युवासाधनेला सुरुवात होते. युवावर्गाचा जास्तीत जास्त संबंध समाजाशी आलेला असतो . त्याचप्रमाणे हा युवा एक स्वतःचा समाज निर्माण करण्याच्या मार्गी लागलेला असतो. हा समाज चांगला निर्माण व्हावा ह्यासाठी अनेक प्रकारच्या ज्ञानाची गरज युवावर्गाला असते. तरुण वर्गाने स्वतःच्या प्रगतीसाठी सगळ्यात पहिले उचलायला हवे असलेले पाऊल म्हणजे "वाचन". तरुणांनी वाचनावर जास्तीत जास्त भर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण "वाचाल तर वाचाल" असे उगाच म्हटले नाही. जेवढे जास्त आपण वाचन करू तेवढी जास्त आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येते. त्याचबरोबर निर्णयघेण्याचा, आपली मते मांडण्याचा आत्मविश्वास बळावतो. वाचनामुळॆ सकारात्मक दृष्टीकोन वाढतो. म्हणून युवकांनी वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुण वर्गाने वाचनासाठी शिवाजी महाराजांची, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांची, स्वामी विवेकानंदांची, शून्यातून यश प्राप्त करणाऱ्या व्यावसायिकांची, आत्मविश्वास वाढवणारी, वेळेचे महत्त्व देणारी, त्याचप्रमाणे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्व कौशल्य इ. प्रकारची पुस्तक वाचन जास्त गरजेचे आहे.
वाचनाबरोबरच प्रगतीसाठी महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे आपले "शरिर - स्वास्थ ".... शरिर स्वास्थ उत्तम असेल तर आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसते. ते उत्तम ठेवण्यासाठी तरुण वर्गाने 'फास्ट - फूड' खाणे टाळण महत्त्वाच आहे. आहारात सात्वीकता आसने महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर व्यायाम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुण वर्ग जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात प्रसंगावधान राखने महत्त्वाचे आहे. हे शिकण्यासाठी युवकांनी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन नेतृत्व कौशल्य आत्मसात करायला हवी. त्याचप्रमाणे एकत्रीतराहून काम करण्यास शिकणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संवादकौशल्ये आत्मसात करावी. जर का ह्या गोष्टींवर भर दिला तर नक्कीच ते त्यांची प्रगती करू शकतात. आपली ध्येयनिश्चिती करणे देखील सोयीस्कर जाते. युवा वर्गात सगळ्यात जास्त शक्ती, जिद्ध, चिकाटी, मेहनत, घेण्याची इच्छा इ. दिसून येते. ह्या गोष्टींना योग्य दिशा सापडल्यास त्यांना प्रगतीपासून कोणी थांबवू शकत नाही. विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळॆ टेकनॉलॉजी मध्ये फार मोठा बद्दल घडून आलेला आपल्याला दिसतो. ह्या टेकनॉलॉजीचा योग्य तो वापर करून युवावर्ग स्मार्ट व सतत अपडेट राहू शकतो. जी येणाऱ्या काळाची गरज आहे. कारण आपला युवा प्रगत तर राष्ट्र प्रगत.

  - समृद्धी देवस्थळी – (Student - VERSATILE EDUCARE SYSTEM)
एस. वाय. बीए

महाविद्यालय - किर्ती महाविद्यालय

Comments

Post a Comment