मुलांच्या रागावर नियंत्रण मिळवण्याचे ७ उत्तम मार्ग


नमस्कार पालक मित्रांनो,

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे मुलांना घरीच राहव लागतं आहे. ऑनलाइन शाळा, त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळायला न मिळणं आणि पालक घरीच असले तरी त्यांच्या वर्क फ्रॉम होममुळे एकत्र पुरेसा वेळ घालवता न येणं. अशा परिस्थितीचा मुलांनी प्रथमच सामना केला आहे. कठीण परिस्थितीला सामोरं जाताना लहान मुलं मोठ्या व्यक्तींप्रमाणे चिंता व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील भावना रागाच्या माध्यमातून बाहेर पडतात, असं तज्ज्ञ सांगतात. पालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं विविध मार्गाचा अवलंब करतात. त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय आपण करू शकता.


तर Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून सामोरे आलेले पुढचे ७ मुद्दे आपण पाहुयात.

१) मुलांना मिठी मारा.

तुमच्या मुलांना कळू द्यात कि तुम्हाला त्यांची काळजी आहे. जेव्हा ते रागात असतात त्यावेळेस जर तुम्ही त्यांना मिठी मारली तर त्यांचा राग थोड्या फार प्रमाणात शांत होण्यास मदत होते. मिठी मारल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता हे त्यांना कळतं.

२) अंक मोजण्यास सांगा.
अंक मोजल्यामुळे मुलांना त्यांचा राग शांत करण्यासाठी मदत होते. मुलांच लक्ष रागापासून विचलित होऊन मोजत असलेल्या अंकांवर केंद्रित होते. त्यामुळे त्यांना शांत वाटत.

३) शांत रहा.
मुलांच्या रागाचा सामना करण्यासाठी पालकांनी शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे. जर का आपण पालकांनी आपला स्वतःवरच चा ताबा गमावला तर मुलांना शांत करणं कठीण होऊन जाईल. म्हणून पालकांनी शांत राहणंच योग्य आहे.

४) त्यांना प्रतिउत्तर देऊ नका.
एकदा का आपण त्यांना प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली तर ते अजुन रागवण्यास सुरुवात करू शकतात. त्यामुळे कधी लक्ष देणे, कधी तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्यावी हे ठरवणे महत्त्वाचे आहे.

५) मुलांशी बोला.
मुलांना राग कशामुळे येत आहे हे समजणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या मुलांशी बोला त्यांचा रागाचं कारण समजून घ्या आणि जमल्यास त्यांना त्या कारणाच स्पष्टीकरण द्या. हे सगळं मुलांचा राग शांत झाल्यावरच करा अन्यथा त्यांना अजुन राग येईल.

६) मुलांच्या भावना समजून घ्या. 
मुलांना राग आला आहे याची जाणीव तुम्हाला झाली आहे हे त्यांना कळू द्यात. मुलांना पालकांचं लक्ष व प्रेम हवं असतं. त्यामुळे त्यांचा भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

७) मुलांच कौतुक करा व बक्षीस द्या.
मुलांचा राग शांत झाल्यावर त्याचं कौतुक करा. अस केल्यामुळे पुढच्या वेळेस ते जास्त न रागवता शांत राहण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा कधी आपली मुलं चांगलं वागतील व शांत राहतील तेव्हा त्यांना बक्षीस द्या. त्यासाठी "Score Board" देखील बनवू शकता. कधी कधी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ देखील बनवून देऊ शकता.

तर या ७ उत्तम मार्गातून तुम्हाला आपल्या मुलांचा राग
शांत करण्यासाठी नक्कीच मदत होईल.तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page : Versatile Educaare Syste

Facebookk Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System

याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments