मुलांमधील हट्टीपणा हाताळण्याचे ९ सोप्पे मार्ग !!


          लहान मुलांचा स्वभाव सामान्यत: हट्टी असतो. एखादं खेळणं दिसलं की लगेच यांना ते हवं म्हणजे हवंच असतं आणि मग आपली आवडती वस्तू मिळवण्यासाठी ते भर रस्त्यातही रडून, ओरडून, चिडचिड करुन गोंधळ घालू शकतात. मग अशावेळी रस्त्यातील सर्व लोक मुलाच्या आई-वडिलांकडे तुच्छतेने पाहू लागतात. कारण सहाजिकच त्यांना वाटतं आई-वडीलांनी अति लाडवून ठेवल्यामुळे मुल असं झालं आहे. 


        मुलाच्या अशा वागणुकीमुळे आई-वडील त्रस्त होतात. पण थोडा शांततेने विचार करुन आणि संयमाने कृती करुन तुम्ही मुलांच्या वागणुकीत बदल घडवून आणू शकता. पण जर तुमचं मुल सतत हट्टीपणा करत असेल आणि यातून बाहेर पडण्यासाठी तयारच नसेल तर मात्र समजावून आणि गोड बोलून खाली दिलेले काही उपाय तुम्ही त्यांच्यावर करु शकता.

       तर Versatile Educaare System ही Organisation जी गेली १७ वर्ष मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर कार्यरत आहे. याच १७ वर्षांच्या अनुभवातून सामोरे आलेले पुढचे ९ मुद्दे आपण पाहुयात.

१) प्रत्येक वेळेस नाही म्हणू नका.

जर का तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणाल, तर तुमची मुलं तुम्हाला विरोध करायला सुरुवात करतील आणि त्यामुळे त्यांच्यातील हट्टीपणा वाढण्यास सुरुवात होईल.

२) आपल्या मुलांचे ऐका.

आपल्या मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्यात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना जास्त जाणून घेता येईल व त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना सांभाळणं तुमच्यासाठी सोप्पं होईल.

३) घरी आनंददायी वातावरण तयार करा.

जर का तुमची मुलं तुम्हाला घरी नेहमी वाद करताना पाहत असतील तर ते तुमच्यातील त्या भावना आत्मसात करून ते देखील तसेच वागतील. त्यांच्यातला हट्टीपणा वाढू लागेल. म्हणून घरी आनंददायी वातावरण तयार करा.

४) वेगवेगळे पर्याय द्या.

तुमच्या मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी वेगवेगळे पर्याय द्या.जर का त्यांना वेगवेगळे म्हणजेच २-३ पर्याय मिळाले तर ते तुम्हाला विरोध करायचे टाळतील. त्यामुळे त्यांच्यातील हट्टीपणा कमी होण्यास मदत होईल.

५) शांत रहा.

प्रत्येक वेळी मुलांना ओरडल्या व मारल्यामुळे समस्या अजुन बिघडू शकते त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला मुलांना सांभाळणं सोप्प जाईल.

६) तुमच्या मुलांचा आदर करा.

मुलांसोबत खूप उद्धट बोलणे अथवा वागणे यामुळे तुमची मुलं आणखी विरोध करून हट्टी बनतील. त्यामुळे मुलांशी नम्रपणे बोला. त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.

७) आपल्या मुलांना चांगले ओळखा.

जर का तुम्हाला आधीच माहिती असेल की आपलं मुलं या परिस्थितीत काय प्रतिक्रिया देणार आहे तर तुम्ही त्यावेळेस त्यांना नियंत्रित ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले ओळखता व समजून घ्यायला हवं.

८) आधीच नियम बनवा आणि परिणाम ठरवा.

तुमच्या मुलांकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही काही नियम ठरवा व त्याचे होणारे चांगले परिणाम त्यांना सांगा. यामुळे त्यांना काही गोष्टींची कल्पना येईल जे त्यांना योग्य प्रकारे वागण्यास मदत करू शकते.

९) देऊ नका.

प्रत्येक वेळी मुलांना जे हवं आहे ते जर गरजेचं नसेल तर देऊ नका. त्यांना काही काळ रडू द्या, ते स्वत: थांबतील.देणे म्हणजे त्यांचा हट्टीपणा वाढवणे होय. जर का तुम्ही नेहमी त्यांची मागणी पुरवली तर ती त्यांच्यासाठी एक चुकीची पद्धत ठरू शकेल.

तर या ९ मार्गातून तुम्हाला आपल्या मुलांचा हट्टीपणा 
सांभाळण्यात नक्कीच मदत होईल.तुमचा अनुभव व
तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page :

PRAGYAKULAM Facebook Group : 

VERSATILE YouTube : 


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "अंकुरम" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

Post a Comment