महात्मा गांधी म्हणतात की, आई हे मूलांचे पाहिले विद्यापीठ आहे, या वाक्यामध्ये गुरुजींची आई हीच एक शाळा आहे, पहा ना मुल 6 तास शाळेत असतात, आणि 18 तास घरी आई सोबत ! शाळा प्रत्येकाच्याच आयुष्यात उशिरा येते, सुरुवातीची काही वर्षे तर आईच्या विद्यापीठामध्येच जातात. ह्या विद्यापीठा मध्ये ऐकलेला एक एक शब्द, अनुभवलेला अनुभव हा आयुष्याचं सार देत असतो.
तेव्हा शाळा जीवनात काय करते ह्याचे मूल्यमापन करताना, आई नावाच्या शाळेत मुल काय शिकली, किंवा काय शिकलं पाहिजे हे फार महत्त्वाचे ठरते. ह्यालाच Parenting म्हणतात.
गुरुजींची आई म्हणजे श्यामची आई. लहान लहान प्रसंगातून जात धर्म, प्राणी, झाडे, जीव मात्र हे काय असत व त्यांच्या वेदना समजवणारी गुरुजींची आई.
रोपट्याच्या काड्या तोडताना श्यामला त्या रोपट्याचा वेदना समजावणारी आई, समोर एक दलित अबला लाकडाची मोळी उचलू शकत नाही तर त्या बुरसटलेल्या काळात त्या महिलेला मदत करायला लावते, श्याम भित्रा होवू नये म्हणून पाण्यात पोहायला पाठवते.
आताच्या पिढीसाठी अस कुठे वागलं जात, श्याम सारखी भाबडी मुल नाहीत हल्लीची अस म्हणून पालक कामात गुंतून गेलेत. आता संगणकाची दूनिया हे जरी खरे असले तरी मात्र, मुलांमधील बालपण व संवेदनशीलता जपण्यासाठी श्यामची आईचाच मार्ग योग्य ठरेल.
कारण मध्यम वर्गीय व उच्च मध्यम वर्गीय मुलांवर सुखाचा मारा होतोय, मात्र ह्याच मुलांना गरीब मुलांबद्दल संवेदनशिलता नाही वाटत व वेदना ही कळत नाही.
त्याच बरोबर निसर्ग, पक्षी, वाचन, संगीत हे काही अनुभव घरात न दिल्याने मुल मात्र मोबाईल फोन, कार्टून, टीव्ही ह्याच्या अधीन जातात. आणि ह्या मधूनच त्यांची विचारशक्ती व संवेदनांची विकास होत नाही.
आणि त्या वेळेस आपण तक्रार करतो पिक्चर पूर्ण लक्षात राहतो मात्र अभ्यास नाही. कसा राहील अभ्यास लक्षात....
कधीच कोणत्या गोष्टी साठी विचार करण्यास प्रवृत्तच केलेले नसते आपण त्यांना....
खूप सोपं असं ह्या प्रश्नांवर उत्तर आहे ते ही आपल्या पालक वर्गाकडे, थोडासा वेळ द्या मुलांना, गप्पा मारा, दिवस कसा गेला विचारा, निसर्ग, पक्षी, थवे, दाखवा, त्या बदल बोला...
काही गोष्टी अनुभवूद्या कारण अनुभव खूप काही शिकवून जातात. हो मान्य आहे मुलं पडतील, धडपडतील मात्र पुन्हा उठून चालायला कदाचित धावयलाच शिकतील.
हे सर्व सुरू असेल रोज तर का जातील मुल मोबाईल फोनच्या अधीन , का पाहतील कार्टून, होय की नाही...
मला पालक वर्ग चुकीचा असं अजिबात म्हणायच नाही, फक्त पळत्या जगा प्रमाणे स्वतःला गुंतवून ठेवू नका एवढंच .
धन्यवाद.
- अंकिता पेंडूरकर
Comments
Post a Comment