एक होळी अशी ही..

नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या सर्वांचा आवडीचा सण होलिका दहन आणि  रंगपंचमी (होळी) जवळ आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या सणाची आतुरता असते. आणि खरंच का नसेल, खूपच उत्साह आणि आनंदाने साजरा केला जाणारा हा सण आहे. आपण सर्वच भारतीय खूप नशीबवान आहोत. आपल्या प्रत्येक  सण साजरा करण्यामागे कुटुंबाने एकत्र वेळ घालवावा, सुंदर पदार्थांच्या गोडव्यासारखी गोड नाती रहावीत आणि चांगल्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी अशाच हेतूचे असतात. प्रत्येक सणामागे वैज्ञानिक आणि पौराणिक कथात्मक कारणे सुद्धा आहेत. 

चला तर जाणून घेऊयात होळी सणाचे तीन वैशिष्ट्ये..


हा सण साजरा करण्यामागचे पौराणिक कथात्मक आणि वैज्ञानिक कारण - 
या सणामागील पौराणिक कथा ही हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाची आहे. हिरण्यकश्यपू एक स्वार्थी, अहंकारी आणि शक्तिशाली राजा होता. शंकर त्याच्यावर प्रसन्न होते. त्याला वरदान होतं. या राक्षसी वृत्तीचा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा याच दिवशी  विष्णूच्या नरसिंह अवताराने वध केला होता. ही पूर्ण गोष्ट सर्वांनी जरुर पहावी. वाईट गोष्टींचा नाश झाला.  हे होतं पौराणिक कथात्मक कारण. पण वैज्ञानिक कारण सांगतं की झाडांचा वाळलेला पाला, तूप, तेल, नारळ, शेणाच्या गोवऱ्या या सर्व गोष्टींची एकत्र तयार झालेली अग्नि आणि त्यापासून तयार झालेले उष्ण वातावरण आपल्या शरीरासाठी या वसंत ऋतुमध्ये महत्वाचे आहे. अशाने झाडांचा वाळलेला पाला संपून जातो. होळीला परिक्रमा केल्याने अग्नीची उष्णता आपल्या शरीरातील वाईट जीव जंतूंचा नाश करतो म्हणून भारतात होलिका दहन साजरे केले जाते. याच  दिवसांमध्ये आपल्या शरीराला लोह, कॅल्शियम,  प्रोटिन्स, शरीराची उष्णता प्रमाणात राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच यादिवशी पुरणाची पोळी खाण्याची पद्धत आहे. 

आपली सण साजरा करण्याची पद्धत -
आपण होलिका दहन साजरा करण्याचे कारण पाहिले. पण हल्ली रंगपंचमी ज्या पद्धतीने साजरी होते ती पद्धत खरंच चुकीची आहे. अशाने आपणच आपल्या निसर्गाला नकळत संपुष्टात आणत आहोत. (होळीसाठी) रंगपंचमीसाठी जाणून बुजून असे रंग वापरतात जे लवकर शरीरावरून जात नाहीत. रंग खेळताना पाण्याचा अतिवापर करतात. 
पण अशाने पाण्याचा वापर प्रमाणाच्या बाहेर होत आहे. इतर ठिकाणी दुष्काळाचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाय हल्लीचे कलर सिंथेटिक आहेत. असे रंग शरीराला घातक ठरू शकतात. म्हणजेच त्वचेचे आजार होण्याचे कारण बनू शकतात. पूर्वीचे रंग हे फुलं, फळं, पानं यांच्यापासून बनवले जायचे. पूर्वी भरपूर झाडे होती झाड कापणे पाप मानले जात. शिवाय या रंगांनी खेळलो तर फूलाफळांचे उत्तम मिश्रण अंगावर नॅचरल स्क्रब सारखे काम करायचे.  आपली त्वचा सुंदर व्हायची. आता आपली हा सण साजरा करण्याची पद्धत खरंच चुकत आहे. 

सण कसा साजरा केला पाहिजे -
जस आपल्याला निसर्ग देतो आपण ही तसेच त्याला परत करायला हवे. नाही तर निसर्गाचा फटका जोरात बसतोच असे म्हणतात आणि रंग पंचमी हा सण तर आपण निसर्गाचा काहीतरी चांगला वापर  करण्यासाठी आहे. त्याला त्रास देण्यासाठी नाही. मथुरामध्ये अजूनही फुलांच्या पाकळ्या उधळून होळी खेळली जाते. फक्त नॅचरल कलर्सने आणि पाण्याचा वापर न करता सुद्धा आपण आपली रंगपंचमी आनंदाने खेळू शकतो. कमीत कमी पाण्याचा वापर कसा होईल याचा विचार करूनच (होळी) रंगपंचमी साजरी करायला हवी. 
तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एका बाजूला पाण्याचा वापर नाही करायचा नाही आणि झाडांनासुद्धा तोडू शकत नाही. मग फुलांच्या पाकळ्यांची होळी केलेली कशी चालेल? फूलांच्या केलेल्या पाकळ्या तुम्ही नंतर खत बनवण्यासाठी वापरू शकता. म्हणजे सगळ्या पाकळ्यांचा पुनर्वापर होईल. पण यानंतर जर तुमच्याकडे झाडच नसतील तर एवढ सगळ पाकळ्यांचं खत तुम्ही कोणत्या झाडाला देणार? आपल्यावर आज ही जी वेळ आली आहे त्यासाठी आपणच कारणीभूत आहोत.  
पण घाबरू नका याचाही उपाय आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या फळाचे किंवा फुलाचे रोप लावू शकता. म्हणजे तुम्हाला तुम्ही बनवलेल्या सगळ्या खताचा उत्तमरित्या वापर करता येईल. 

पूर्वी लोक एवढे साक्षर नव्हते त्यांना ही दोन्ही कारणे माहिती होती. पण जर सणामागचे कारण वैज्ञानिक पद्धतीने समोर आले असते तर कोणीच ते मनापासून पाळले नसते. पूर्वी लोक प्रचंड धार्मिक होते म्हणून  सणांमागे पौराणिक कथात्मक कारणे निर्माण करण्यात आली. आणि लोक हीच बरोबर मानून सण बरोबर आणि चांगल्या पद्धतीने साजरा करू लागले.

अशा प्रकारे होळी सणाची वैशिष्ट्ये पाहून होळी नक्की कशी साजरी केली पाहिजे ते आपण पाहिलं आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षी तुम्ही नक्कीच Eco - Friendly होळी खेळाल त्यासाठी तुम्हा सर्वांना संपूर्ण वर्सटाईल परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

 तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

  1. Fantastic 👌👌👍 Very useful for today's generation👋👋👋👋👋👍🙏

    ReplyDelete
  2. Khup Sundar lihila aahes Mrunal... Kamal♥️

    ReplyDelete

Post a Comment